आकाश अंबानी आणि श्लोका मेहता आज अडकणार विवाहबंधनात, सोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

2

मुंबई | आकाश अंबानी आणि श्लोका मेहता हे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. आकाश अंबानी आणि बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा आहे. तर श्लोका मेहता ही प्रसिध्द बिझनेसमन रसेल मेहता यांची मुलगी आहे. आज सायंकाळी साडे सात वाजता हिंदू पध्दतीने हा विवाह सोहळा पार पडणार आहे. जियो वर्ल्ड सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी जियो वर्ल्ड सेंटर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटींसह जगभरातील काही मोठे नेतेही या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.

 

बालपणीचे मित्र आहेत श्लोका आणि आकाश
आकाश अंबानी श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. श्लोका ही हिरे व्यापारी रसे मेहता यांची मुलगी आहे. आकाश आणि श्लोका बालपणाचे मित्र आहेत. दोघांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले. श्लोका 27 वर्षांची आहे. आकाश अंबानीने गोव्याच्या एका रिजॉर्ट अँड स्पामध्ये श्लोकाला प्रपोज केले होते. यानंतर दोघांचा साखरपूडा झाला होता.

आमिर खान आणि किरन राव यांची उपस्थिती