मुकेश अंबानींच्या घरी पुन्हा वाजणार सनई चौघडे, आकाश अंबानी चढणार बोहल्यावर; लग्नाचे पहिले निमंत्रण सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी हा श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सोमवारी सायंकाळी निता, अनंत आणि मुकेश अंबानी यांनी आकाश आणि श्लोका यांच्या लग्नाचे पहिले निमंत्रण सिद्धीविनायकाला दिले. यावेळी अंबानी कुटुंबीयांनी हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे अशी सिद्धीविनायकाकडे प्रार्थना केली.

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता 9 मार्च रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. जून 2018 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. मुंबईतील वांद्रे कुर्ला येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तत्पू्र्वी आकाश अंबानीने 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये मोठी बॅचलर पार्टीचे आयोजन केले आहे.