मुकेश अंबानींच्या मुलाची लग्नपत्रिका पाहिली का? फोटो होतोय व्हायरल

मुंबई. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मुलगी ईशा अंबानी काही महिन्यांपुर्वीच आनंद पिरामलसोबत विवाहबंधनात अडकली. आता अंबानी कुटूंब पुन्हा लग्नाच्या तयारीला लागले आहेत. लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. 9 मार्चला हा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. लग्नाच्या पत्रिकाही तयार आहेत. या लग्नपत्रिकेचा फोटो सध्या व्हायरल होतोय.

काल मुकेश अंबानी आणि नीता अंबानी सिध्दी विनायक मंदिरात दर्शनासाठी जाऊन आले. यावेळी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्यांच्यासोबत होता. त्यांनी मंदिरात मुलाच्या लग्नाची पत्रिका दिली.

आकाश आणि श्लोका हे बलपणीचे मित्र आहेत. गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांचा साखरपूडा झाला. आता मार्च 2019 मध्ये यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश अंबानी लवकरच बॅचलर पार्टी अरेंज करणार आहे. यामध्ये 500 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. बॉलिवूडमधून रणबीर कपूर, करण जोहर ही हजेरी लावणार आहेत.