अजय देवगणच्या ‘तानाजी-द अनसंग वॉरियर’तील फर्स्ट लूक रिलीज

‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ ही सिंहगर्जना पुन्हा एकदा गुंजणार आहे. छत्रपती शिवरायांचे लढवय्या मावळे तानाजी मालुसरे यांच्या जीवनपटावर अजय देवगण, तानाजी मालसुरे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘तानाजी… द अनसंग वॉरिअर’ असे या चित्रपटाचे नाव असून सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर अजय देवगणचे पोस्टर शेअर केले आहे.