व्हाइस चीफ मार्शल म्हणाले राफेलमुळे भारतीय लष्कराला बळकटी मिळेल, सप्टेंबरमध्ये मिळणार पहिले विमान

नवी दिल्ली | देशात राफेल डीलवरून मोठा वाद सुरू असला तरी राफेल मिळण्याची प्रक्रिया वेळेनुसार सुरू आहे. त्यानुसार भारताला सप्टेंबर महिन्यापर्यंत पहिले राफेल विमान ताब्यात मिळणार असल्याची माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

पहिल्या राफेल विमानाची डिलिव्हरी फ्रान्समध्ये होणार असून तेथून ते भारतात आणले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान राफेलच्या हवाई दलातील प्रवेशामुळे भारतीय लष्कराला बळकटी मिळणार असल्याचे व्हाइस चीफ मार्शल अनिल खोसला म्हणाले.