ट्रक कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

1

अहमदनगर | नगरहून बीडच्या दिशेने येणाऱ्या ट्रक आणि बीडहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या कारची समोरासमोर धडक होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

नगर-बीड राज्यमार्गावरील पोखरी शिवाराजवळ हा अपघात झाला. या अपघातातील सर्वजण नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय आहे. नागेश चमकुरे, योगेश चमकुरे, अनुजा चमकुरे आणि सात वर्षीय अनिकेत चमकुरे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. सकाळची वेळ असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येतोय. अपघाता मृत्यू झालेले एकाच कुटुंबातील आहेत. नांदेड जिल्ह्यातील ते मुळचे रहिवासी आहेत. ते नांदेडहून गुजरातला जात होते. हा अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. घटनेविषयी पोलीस अधिक तपास करत आहेत.