‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम सखी गोखले आणि सुव्रत जोशीने बांधली लगीन गाठ

मुंबई | ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. आज त्यांनी विवाह केला. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत या दोघांचे प्रेम फुलले होते. तेव्हापासून दोघांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा होती. सोशल मीडियावर हे दोघं नेहमी एकत्र फोटो शेअर करायचे. यावरुन चाहत्यांना अंदाज होताच. आता या दोघांनी लग्न करुन त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

सखी गोखले ही दिवंगत अभिनेता मोहन गोखले यांची मुलगी आहे. अदाकारीने आणि लुक्सने तिने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकले. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत ती एका सोज्वळ मुलीच्या भूमिकेत दिसली होती. या मालिकेत तिच्यासोबत अमेय वाघ,पूजा ठोंबरे, पियुष चिपळुणकर, स्वानंदी टीकेकर, सुव्रत जोशी यांसारख्या तरुण कलाकारांनीही भूमिका केली. या मालितेच तिचे आणि सुव्रत जोशीचे प्रेम फुलले आणि आता त्यांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी जोडीदार बनवले आहे.