ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मराठी रंगभूमी आणि सिनेमातून स्वत:चा वेगळा ठसा उमठवला.

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसंच ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील खट्याळ आजोबा, ‘जब वुई मेट’मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. किशोर यांचा जन्म नागपुरमध्ये झाला. 12 वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी नागपुरमध्येच पुर्ण केले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते मुंबईत आले. या दरम्यान त्यांनी अनेक मोठ्या स्टेज शोमध्ये काम केले. त्यांनी 100 पेक्षा जास्त मराठी आणि 18 इंग्रजी नाटकांमध्ये काम केले आहे.