नववर्षाच्या सुरुवातीलाच बॉलिवूडला धक्का, ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

(संग्रहित फोटो)

मुंबई | भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता कादर खान यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा मुलगा सरफराज खान याने ही माहिती दिली. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी कॅनडात अखेरचा श्वास घेतला.

जवळपास 300 हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केले होते. फार कमी जणांना माहीत आहे की, कादर खान केवळ अभिनेतेच नाही तर प्रसिद्ध संवादलेखकही होते. 1974 साली आलेल्या ‘दाग’ चित्रपटात त्यांनी संवादलेखन केले होते आणि राजेश खन्ना यांच्या आग्रहावरुन त्यांना चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यांना त्याकाळी एक लाख रुपये दिले होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झालीय.