‘ड्रीम गर्ल’च्या प्रचारासाठी मैदानात उतरले धर्मेंद्र, शोले स्टाइलने मागितली मतं 

नवी दिल्ली | बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र रविवारी आपली पत्नी हेमा मालिनींच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. हेमा मालिनी या मथुरेतील भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार आहे. आपल्या पत्नीचा प्रचार करण्यासाठी धर्मेंद्र मुंबईहून मथुरेत पोहोचले. प्रचारसभेत धर्मेंद्र यांनी शोले स्टाइलनी मतं मागितली. धर्मेंद्र वीरुच्या अंदाजात म्हणाले की, ‘अरे गांव वालों अगर आपने हेमा मालिनी को अच्छे वोटों से नहीं जिताया तो इस गांव में जो टंकी है ना… मैं उस पर चढ़ जाऊंगा’, असे म्हणत त्यांनी जनतेला हेमा मालिनींचा निवडून देण्याचे आवाहन केले.

देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे

धर्मेंद्र म्हणाले की, पंजाबासून आसामपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक लहान मुलगा आणि वयस्कर व्यक्तीने आपल्या भारत देशाच्या आणि युवावर्ग प्रगतीसाठी काम करायला हवे. आपण देशाला आई म्हणतो. यामुळे देशाच्या प्रगतीसाठी शक्य होईल तसा हातभार लावण्याचं काम जनता करत असते. यामुळे जर आपल्या आईकडे वाकड्या नजरेने बघणऱ्यांना चांगलाच धडा शिकवा असेही ते म्हणाले.

हेमा नक्कीच यशस्वी होणार

हेमा मालिनी या निवडणुकीत विजयी होणार की नाही या प्रश्नावर धर्मेंद्र म्हणाले की, ‘हेमा खासदार होणार नाही तर झाल्या आहेत. मी त्यांच्या प्रचारासाठी आलो आहे. जेव्हा एखादे काम मनापासून केले जाते, ते यशस्वी होतेच. हेमा यांनीही तसेच केले आहे.’
https://twitter.com/ANINewsUP/status/1117327102083248129