शांतिगिरी महाराजांनंतर अब्दुल सत्तारांचाही हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा, खैरेंपुढे तगडे आव्हान

औरंगाबाद | काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे प्रमुख व औरंगाबाद लोकसभेतील उमेदवार हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा जाहीर केला आहे. शांतिगिरी महाराजांनीही यापूर्वी हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा जाहीर केला होता. या दोन दिग्गजांच्या पाठिंब्यांमुळे हर्षवर्धन विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत, तर सलग चार वेळा विजयी होणाऱ्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

सत्तार-दानवेंच्या भेटीमुळे पाठिंब्याची होती चर्चा

हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. दानवे जेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हा अब्दुल सत्तार यांनी दानवेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतरच सत्तारांचा जाधवांना पाठिंबा असणार याची चर्चा होती. अखेर आज पत्रकार परिषदेत सत्तारांनी जाधवांना पाठिंबा जाहीर केला आहे.