केस विरळ होत आहेत ना? या आयुर्वेदिक उपायांनी दूर होतील केसांच्या सर्व समस्या

29

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि केस सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात. केस सुंदर असतील तर आपण अधिकच सुंदर दिसतो. याचमुळेच लोक आपल्या केसांवर जास्त लक्ष देत असतात. पण प्रदुषण आणि योग्य काळजी न घेतल्यामुळे केस कोरडे आणि विरळ होतात. केसांमध्ये कोंडा होतो. मग केस पुन्हा सुंदर बनवण्यासाठी लोक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. ट्रीटमेंट करतात, पण तरीही योग्य तो परिणाम त्यांना दिसत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यावरुन तुम्ही नैसर्गिकरित्या तुमचे केस सुंदर बनवू शकता. तुमची केस गळण्याची समस्या दूर होईल आणि केस सुंदर दिसतील.

वाचा या 5 आयुर्वेदिक टिप्स

1. मेथी दाणे

मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी असते. यामध्ये प्रोटीन आणि निकोटीनही असते. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते. स्कॅल्प हेल्दी राहते आणि केस डॅमेज होत नाही. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मेथीचा समावेश करु शकता. रात्री दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. सकाळी या पाण्याचे सेवन करा. यामधील मेथी दाण्याची पेस्ट बनवा आणि केसांच्या मुळाशी लावून 20 मिनिटांनंतर केस धुवून घ्या. केस दाट, लांब आणि मजबूत होतील.

2. भृंगराज तेल

केसांना दाट आणि मजबूत बनवण्यासाठी भृंगराज तेल खुप फायदेशीर ठरते. हा एक प्राचिन उपाय आहे. भृंगराज तेलामध्ये अनेक अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे केस दाट आणि लांब होतात.

3. आवळा 

आहारात व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास केस जास्त गळतात आणि कोंडा होण्याची समस्या होते. पण आवळ्याचे सेवन केल्याने आणि आवळ्याच्या तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. यासोबतच केस दीर्घकाळ काळे आणि दाट राहतात.

4. दही

दही हे शीत प्रवृत्तीचे असते. यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात. प्रोटीनमुळे स्कॅल्प निरोगी राहते. दह्याने केसांची मसाज करा आणि 15 मिनिटांनी शाम्पूने केस धुवून घ्या. केसांवर दही लावल्याने केस मजबूत आणि सिल्की होतात.

5. हे पदार्थही फायदेशीर

आयुर्वेदात सांगितल्यानुसार केसांच्या समस्या दूर करण्यासाठी ताक, दालचीनी, टरबूज, द्राक्षांचे सेवन करावे. यामुळे शरीराला आवश्यक न्यूट्रिएंट्स मिळतात आणि केस हेल्दी होण्यास मदत होते.