खासदारांनी उमेदवारी निश्चित समजू नये: रावसाहेब दानवे

नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करू : दानवे

अहमदनगर | पक्षाच्या खासदारांनी येत्या लोकसभा निवडणुकीत आपली उमेदवारी निश्चित समजू नये, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. नगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. पक्षाचा उमेदवार निवडीच्या पद्धतीनुसारच लोकसभेचा उमेदवार ठरवला जाईल. कोणत्याही खासदाराने उमेदवारी निश्चित समजू नये, कामगिरी पाहूनच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तरी, आम्ही संघटना बांधणीच्या बळावर पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.