#IndiaStrikesBack: 10 Points मध्ये जाणून घ्या, भारताने कसा घेतला पुलवामाचा बदला !

6

नवी दिल्ली | भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटेच पाकिस्तानातील लष्करी तळांवर हल्ला करत पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय जवानांनी पाकिस्तानातील लष्करी तळांवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हा संपूर्ण हल्ला कशाप्रकारे करण्यात आला याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

अशी राबवली एअर स्ट्राइक

01. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी वारंवार स्पष्ट केले होते की, लवकरात लवकर पाकिस्तानातील दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल.
———————————————————————————————–
02. 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर नियंत्रण रेषा आणि पाकिस्तानच्या सीमेवर लष्कराच्या हालचालींना वेग आला होता. वायुसेनेने राजस्थानात युद्धसराव केल्याचेही वृत्त होते.
———————————————————————————————–
03. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वात ही संपूर्ण मोहीम राबवण्यात आली. भारतात आणखी हल्ले घडणार याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली होती. त्यामुळे दहशतवादी तळांवर ही कारवाई करण्यात आली.
———————————————————————————————–
04. भारतीय हवाई दलाच्या मिराज-2000 विमानांच्या साहाय्याने पाकिस्तानातील लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी मंगळवारी कारवाई करण्यात आली.
———————————————————————————————–
05. मंगळवारी पहाटे 3.30 मिनिटांनी भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानातील बालाकोट, मुजफ्फराबाद आणि चाकोती येथील तळांवर हल्ला चढवला. 21 मिनिटांच्या कारवाईत अनेक दहशतवादी तळे बेचिराख करण्यात आली.
———————————————————————————————–
06. भारतीय हवाई दलातील 12 मिराज-2000 विमानांनी जैश ए मोहम्मद, लश्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तानातील तळांना लक्ष्य केले.
———————————————————————————————–
07. या कारवाईमध्ये पाकिस्तानवर तब्बल 1000 किलो बॉम्बचा वर्षाव करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. याठिकाणी युसूफ अझहर म्हणजे मसूद अझहरचा भाऊ दहशतवाद्यांचा कॅम्प चालवत होता.
———————————————————————————————–
08. भारताच्या मिराज-2000 विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला करताच पाकिस्तानची एफ16s ही लढाऊ विमाने प्रतिहल्ला करण्यासाठी आली; पण मिराज-2000 विमानांनी केलेला मारा पाहून या विमानांनी पळ काढला.
———————————————————————————————–
09. भारतीय लढाऊ विमानांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये एक लक्ष्य पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात असल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणी मिराज जेट विमांनांनी दहशतवाद्यांची तळं उध्वस्त केले.
———————————————————————————————–
10. पाकमधील दहशतवादी तळांवरील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेली कारवाई असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानातही चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – 

जैश आणखी हल्ले घडवणार याची माहिती होती.. त्याआधीच भारताने दहशतवाद्यांना संपवले – परराष्ट्र मंत्रालय

भारतीय वायूदलाचे सर्व स्तरातून कौतूक, राहूल गांधींचा सॅल्यूट, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

‘मिराज-2000’ने केली कमाल, जाणून घ्या या लढाऊ विमानाचे वैशिष्ट्य

एयरफोर्सच्या हल्ल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक

पुलवामाचा बदला : भारतीय हवाई दलाने केला 200 दहशतवाद्यांचा खात्मा, जैशचे कंट्रोल रुम उध्वस्त

भारताच्या हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान, मसूद अझहरला रुग्णालयातून गुप्त ठिकाणी लपवले