गुजरातमध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 10 जण मृत्युमुखी

अहमदाबाद | गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंबीय एसयूव्हीमधून प्रवास करत होते. दोन ट्रकमध्ये त्यांची गाडी आल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशीरा भचाऊ महामार्गावर मिठाने भरलेला ट्रक डिव्हायडरला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटला. यादरम्यान त्याची एसयूव्हीला धडक बसली. याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकचीही एसयूव्ही धडक बसली. या भीषण अपघातात 10 जण जागीच ठार झाले.