IPL 2022, SRH vs LSG | केएल आणि हुड्डाची अर्धशतकी खेळी, हैदराबादला 170 धावांचं आव्हान – amnews.live

IPL 2022, SRH vs LSG | केएल आणि हुड्डाची अर्धशतकी खेळी, हैदराबादला 170 धावांचं आव्हान – amnews.live

लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) सनरायज हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 170 धावांचे आव्हान दिले आहे.

मुंबई : कॅप्टन केएल राहुल (K L Rahul) आणि दीपक हुड्डाच्या (Deepak Hudda) अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) सनरायज हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 170 धावांचे आव्हान दिले आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. (ipl 2022 srh vs lsg lucknow super giants set 170 runs target for winning to sunrisers hyderabad)

लखनऊकडून केएल राहुलने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर दीपक हुड्डाने 51 रन्सचं योगदान दिलं. त्याशिवाय आयुष बदोनीने 19 रन्स केल्या. तर मनिष पांडेने 11 धावा केल्या. या व्यतिरिक्त लखनऊच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड आणि टी नटराजनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.