सर्जनशीलता:निरोगी आणि सक्रिय मेंदूसाठी सर्जनशीलता खूप महत्त्वाची, यामुळे आनंद मिळतो, एकाग्रता वाढते

सर्जनशीलता:निरोगी आणि सक्रिय मेंदूसाठी सर्जनशीलता खूप महत्त्वाची, यामुळे आनंद मिळतो, एकाग्रता वाढते

वायर्ड मॅगझिननुसार, सर्जनशीलता, कुतूहल, कल्पनाशक्ती आणि अनुभव यांसारख्या मूलभूत मानवी वैशिष्ट्यांवर अवलंबून असलेल्या नोकऱ्या एआयने रिप्लेस करणे कठीण आहे. यातही सर्जनशीलता विशेष महत्त्वाची आहे, कारण ती अनपेक्षित बदलांना सामोरे जाण्यास शिकवते. पेनसिल्व्हेनिया येथील ड्रेसेल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. जॉन कुनिओस यांच्या मते, सर्जनशीलता ही परिस्थिती किंवा कल्पनेच्या मूलभूत तत्त्वाची पुनर्रचना करत असते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. यामुळे एकाग्रता आणि आनंद वाढतो. सर्जनशीलता मेंदूला निरोगी आणि चैतन्यशील ठेवते.

या पद्धतींनी वाढवता येते सर्जनशीलता वाचन, वादविवाद करा गूढ कादंबऱ्या वाचून, संगीत ऐकून, संग्रहालयांना भेट देऊन आणि थेट वादविवादांमध्ये भाग घेऊन सर्जनशीलता वाढते. गूढ किंवा समस्येवर उपाय शोधताना मेंदूचा न्यूरल रिवॉर्ड प्रोसेसिंग सिग्नल सक्रिय होतो. त्यामुळे तुमची खोलवर विचार करण्याची क्षमता वाढते.

६ रंगांची लेबलिंग करा समस्या ६ वेगवेगळ्या प्रकारे दाखवते काळा रंग म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन उपायाचा कोणता भाग काम करणार नाही. निळा रंग म्हणजे व्यापक विचार एकूण सर्वोत्तम उपाय काय असेल. हिरवा म्हणजे सर्जनशील मार्ग पर्यायी उपाय काय असू शकतो. लाल रंग म्हणजे भावनिक विचार तुमच्या भावना काय सांगतात? पांढरा रंग म्हणजे तटस्थ भाव फक्त तथ्ये विचारात घ्या. पिवळा रंग म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन उपायाचा कोणता भाग कार्यरत आहे.