वैजापूर: कांद्याला किलोमागे अवघे 52 पैसे, शेतकऱ्याने रस्त्यावर फेकला 30 क्विंटल कांदा

औरंगाबाद | वैजापूर बाजार समितीत कांद्याला किलोमागे केवळ 52 पैसे भाव मिळाला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने 30 क्विंटल कांदा रस्त्यावर फेकला. रस्त्यावर अचानक कांद्याचा ढीग साचल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील वाहतूक व्यवस्था दोन तास कोलमडली होती. कांद्याच्या वाहतुकीचा खर्चही परवडत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील अनुदान दुप्पट केले आहे. यामुळे वर्षाच्या सुरूवातीलाच कांद्याचे भाव वाढले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात तरी कांद्याला चांगले भाव मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र हा दिलासाही फोल ठरला आहे.