लोकसभेची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला : रावसाहेब दानवे

धुळे | लोकसभा निवडणुकीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघणार, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. धुळ्यात भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. आपापली कामे करून घ्या, नंतर भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. तसेच शिवसेनेच्या अयोध्या मुद्याला भाजपचा पाठिंबा आहे. शिवसेनेसोबत युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.