राज्यातील 900 गावांत दुष्काळ जाहीर होणार, मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई | राज्यातील 900 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी आणि कमी पर्जन्यमान असलेल्या गावात दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठीचा जीआर राज्य सरकारकडून आज किंवा उद्या काढला जाऊ शकतो. राज्य सरकारने 151 तालुक्यांत 31 ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर केला आहे. यातील 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.