ब्रह्मास्त्र OTT रिलीज:थिएटरनंतर आता OTT वर धूम करणार रणबीर-आलियाचा चित्रपट, डिस्ने प्लस हॉटस्टारवर होऊ शकतो स्ट्रीम

ब्रह्मास्त्र OTT रिलीज:थिएटरनंतर आता OTT वर धूम करणार रणबीर-आलियाचा चित्रपट, डिस्ने प्लस हॉटस्टारवर होऊ शकतो स्ट्रीम

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे 23 ऑक्टोबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट 23 नव्हे तर 4 नोव्हेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

निर्मात्यांनी याची पुष्टी केलेली नाही

मात्र, अद्याप याविषयी निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा चित्रपट 23 ऑक्टोबरला OTT वर स्ट्रीम होईल की नाही हे सांगणे कठीण आहे. पण असे झाले तर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांत ओटीटीवर येईल.

ब्रह्मास्त्र’ने 400 कोटींची कमाई केली आहे

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. 410 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 400 कोटींची कमाई केली आहे. रणबीर आणि आलियाशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जुन अक्किनेनी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या 5 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक व्हिज्युअल ट्रीट आहे, असे प्रेक्षकांनी मत नोंदवले आहे.

2025 मध्ये रिलीज होणार या चित्रपटाचा दुसरा भाग
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये अनेक प्रश्न अपूर्ण राहिले आहेत, जे निर्माते पुढील भागात उघड करतील. दिग्दर्शक अयान मुखर्जीने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाचा दुसरा भाग 2025 पर्यंत प्रदर्शित होईल.