शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्…

शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्…

Salman and Shilpa Shetty date : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं (Salman Khan) नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. मात्र, सलमाननं कधी लग्न केलं नाही. आजही त्याच्याशी लग्न करण्यासाठी हजोरोच्या संख्येन मुली तयार आहेत. त्याच्या चाहत्या आजही तो कधी लग्न करणार असा प्रश्न विचारत असतात. करियरचा सुरुवातीपासून सलमानचे नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले. मग ती सोमी अली असो संगीता बिजलानी, ऐश्वर्यापासून ते कतरीना पर्यंत. सलमानचा सगळ्याच गर्लफ्रेंड मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का की, सलमानन एके काळी शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) जवळ जाण्याच प्रयत्न करत होता, पण तिच्या वडिलांनी त्याचा हा प्लॅन फेल केला.

सलमान खान आणि शिल्पा शेट्टी हे एकेकाळचे बॉलिवूडचे सुपरस्टार एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एकदा खुद्द सलमान खानने फराह खान समोर या गोष्टीचा खुलासा केला होता की , तो शिल्पाला डिनर डेटवर घेऊन जायला निघाला होता, परंतु शिल्पाचा वडिलांनी सलमानला बाल्कनीतूनच असे सुनावले की त्याचे मन दुखावले. सलमानच्या ‘दस का दम’ शोच्या तिसऱ्या पर्वात शिल्पा आणि फराहनं हजेरी लावली होती. त्यावेळी सलमानने शिल्पाला डिनर डेटवर घेऊन जाण्याचा किस्सा सर्वांसमोर सांगितला.