‘नाटू-नाटू’ गाण्यावर थिरकली आलिया भट्ट:अवॉर्ड फंक्शनमध्ये साडीत केला जबरदस्त डान्स, हटणार नाही तुमची नजर!

‘नाटू-नाटू’ गाण्यावर थिरकली आलिया भट्ट:अवॉर्ड फंक्शनमध्ये साडीत केला जबरदस्त डान्स, हटणार नाही तुमची नजर!

काल रात्री म्हणजेच रविवारी मुंबईत झी सिनेमा अवॉर्ड्स 2023 चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कियारा अडवाणी, बॉबी देओलपासून ते शाहिद कपूरपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या परफॉर्मन्सने सोहळ्याला चारचाँद लावले. आलियाच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

आलियाने अनवाणी पायाने केला डान्स
या व्हिडिओमध्ये आलिया ‘गंगूबाई काठियावाडी’च्या लूकमध्ये दिसत आहे. तिने पांढरी साडी नेसली असून केसांचा बन बनवला आहे. यादरम्यान तिने ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील ‘ढोलिडा’ गाण्यावर स्टेजवर एन्ट्री घेतली, त्यानंतर ती ‘आरआरआर’ या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्यावर थिरकली. व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा आणि त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणाही आलियासोबत डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी केले कौतुक
हा व्हिडिओ समोर येताच चाहते आलियाचे खूप कौतुक करत आहेत. आई झाल्यानंतर आलियाने पहिल्यांदाच एखाद्या अवॉर्ड फंक्शनमध्ये डान्स केला आहे. तिची एनर्जी लेव्हल पाहून चाहते खूपच प्रभावित झाले होते. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘आलियाची एनर्जी लेव्हल रणवीर सिंगसारखी आहे’. तर आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आलियाचा परफॉर्मन्स कंगना रनोटच्या संपूर्ण करिअरच्या बरोबरीचा आहे’.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये झळकणार आहे आलिया
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर रणवीर सिंह दिसणार आहे. याशिवाय आलिया भट्ट झोया अख्तर दिग्दर्शित करत असलेल्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलियासोबत कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश आहे.