मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू

मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

उज्जैन | मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहेत. रामगढ गावात सोमवारी रात्री हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लग्नावरून परतत असताना हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेले सर्व जण हे उज्जैनचे रहिवासी होते. अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री एकच्या सुमारास वेगाने येणाऱ्या कारची धडक बसल्याने हा अपघात झाला.