बुलडाण्यात ट्रॅव्हल्स व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार

बुलडाणा | मोताळा तालुक्यात चिंचपूर फाट्याजवळ ट्रॅव्हल्स व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक दूध उत्पादक शेतकरी जागीच ठार झाला. प्रमोद रामदास मापारी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.

दरम्यान, या घटनेमुळे चिंचपूर येथे तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडल्या. यामुळे मलकापूर-सोलापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. एका तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यामुळे अतिरिक्त कुमक बोलावून परिस्थितीवर ताबा मिळवण्यात आला.