नववर्षाची भेट…विनाअनुदानित गॅस सिलेंडर 120 रूपयांनी स्वस्त

नवी दिल्ली | नववर्षानिमित्त केंद्र सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 120.50 रूपयांनी तर अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात 5.91 रूपयांनी कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासह पेट्रोलच्या दरात 20 पैसे आणि डिझेलच्या दरात 23 पैशांनी कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रूपयाचा भाव वधारल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.