कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारींच्या नियुक्तीसाठी मुलाखती सुरू, 81 पात्र अर्जदारांत 3 महिलाही

3

कोल्हापूर | येथील अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमणुकीसाठी राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बुधवारपासून पुजारी पदासाठी 81 पात्र अर्जदारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली. तीन दिवस या मुलाखती चालणार आहेत. या पात्र अर्जदारांमध्ये महिलांचाही समावेश आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पगारी पुजाऱ्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली. देवस्थान समितीने यासंदर्भात जाहिरात काढल्यानंतर 253 अर्ज आले. त्यापैकी 81 उमेदवार पात्र ठरले असून मुलाखत प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. यामध्ये तीन महिला अर्जदारांचाही समावेश आहे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाखतीमध्ये उमेदवारांना परंपरा, नित्य पूजा असे प्रश्न विचारण्यात येत आहेत.