‘ईसिस’च्या संपर्कात असल्याचा संशय: औरंगाबाद, मुंब्रामधून 9 जण ताब्यात

एटीएसकडून चौकशी सुरू

औरंगाबाद | ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने औरंगाबाद आणि मुंब्रामधून 9 जणांना ताब्यात घेतले आहे. औरंगाबादच्या कैसर कॉलनीतून एकाला तर इतर दोन ठिकाणांहून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी दोघांची नावं मोहसीन खान आणि मुशाहिद उल इस्लाम अशी आहेत. मुशाहिदच्या घरातून हार्ड डिस्कसह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुंब्र्यातून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तरुण सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून इसिसच्या दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याचा संशय आहे. या सर्वांवर मागील महिनाभरापासून ‘आयबी’ आणि ‘एनआयए’ची पाळत होती. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात इसिस मॉड्युलवर कारवाई केल्यानंतर महाराष्ट्रातील काही नावे समोर आली होती. त्यातूनच मंगळवारी एनआयए, उत्तर प्रदेश एटीएस आणि महाराष्ट्र एटीएसने ही संयुक्त कारवाई केली आहे.