जेवल्या जेवल्या लगेच ‘या’ गोष्टी करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

जेवल्या जेवल्या लगेच ‘या’ गोष्टी करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान

जेवताना आणि जेवल्यानंतर तुम्हाला ही सवय आहे, आताच सोडा अन्यथा होईल मोठी हानी

मुंबई : शारीरिक आरोग्यासाठी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची पूर्ण काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आहारात निष्काळजी केली, तर तुमच्या शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.काही लोक काळजी घेतात, तरीही अनेक वेळा चांगला आहार घेऊनही तब्येत चांगली राहात नाही का? असे घडते कारण लोक जेवताना किंवा जेवल्यानंतर अशा काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागते. या चुका कोणत्या आहेत, त्या जाणून घेऊयात.

‘या’ पाच चुका टाळा
व्यायाम टाळा: अन्न खाल्ल्यानंतर कधीही व्यायाम करू नका, यामुळे पचन बिघडू शकते. खाल्ल्यानंतर व्यायाम केल्याने मळमळ, उलट्या, पोटदुखी यांसारख्या समस्याही उद्भवतात. अशा स्थितीत जेवणानंतर व्यायाम करू नये.

पाणी पिऊ नका : अन्न खाताना जास्त पाणी पिऊ नका. पाणी पचनसंस्था कमजोर करते. तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल पातळ होते आणि पचनक्रिया बिघडते. त्यामुळे जेवताना आणि नंतर लगेच पाणी पिऊ नये.

फळे खाऊ नका: फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते, परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते अन्न खाल्ल्यानंतर लगेच फळांचे सेवन करू नये. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर लगेच फळे खाल्ले तर शरीराला अन्नातील पोषक तत्व पूर्णपणे मिळत नाहीत.

जेवल्यानंतर लगेच झोपू नका: दिवसभर काम केल्यावर, माणूस रात्रीपर्यंत इतका थकतो की त्याला जेवल्यानंतर लगेच झोप येऊ लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपण्याची किंवा पडून राहण्याची सवय असेल, तर ही सवय लगेच बदला. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने पोटाचा त्रास आणि लठ्ठपणा होऊ शकतो.

दारू पिऊ नका : आरोग्य तज्ज्ञांच्या मते अन्न खाल्ल्यानंतर दारू आणि सिगारेटचे सेवन करू नये. त्यामुळे आरोग्याची मोठी हानी होते.

दरम्यान जर तुम्ही जेवताना आणि जेवल्यानंतर वरील गोष्टींचे सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.