अक्षय कुमारने अजय देवगणला टाकले मागे:रामसेतूचे ओपनिंग कलेक्शन थँक गॉडपेक्षा दुप्पट

अक्षय कुमारने अजय देवगणला टाकले मागे:रामसेतूचे ओपनिंग कलेक्शन थँक गॉडपेक्षा दुप्पट

दिवाळीला प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या रामसेतू या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे 15 कोटींची कमाई केली आहे, तर त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या अजय देवगण स्टारर चित्रपट थँक गॉडने पहिल्या दिवशी सुमारे ८ कोटींची कमाई केली आहे. दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर अक्षयच्या चित्रपटाने बाजी मारली आहे.

अक्षयला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, कारण गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडले आहेत. मात्र, या बाबतीत अजय देवगणचा रेकॉर्डही चांगला नाही, कारण या वर्षी प्रदर्शित झालेले त्याचे चित्रपटही काही कमाल दाखवू शकले नाहीत.

अक्षयच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा रामसेतूचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन चांगले
रामसेतूने पहिल्याच दिवशी 15 कोटींची कमाई केली आहे. याआधी, अक्षयच्या गेल्या दोन वर्षांत प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, रामसेतूपेक्षा फक्त सूर्यवंशीचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन चांगले आहे. सूर्यवंशीने पहिल्या दिवशी जवळपास 26.29 कोटींची कमाई केली होती. पहिल्या दिवसाच्या सर्वाधिक कलेक्शनबद्दल सांगायचे तर, या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांमध्ये ब्रह्मास्त्र नंतर रामसेतूने दुसरे स्थान पटकावले आहे.

अजय देवगणच्या रनवे 34 ने पहिल्या दिवशी केवळ 3 कोटींची कमाई केली होती
अजयचे रनवे 34 आणि गंगूबाई काठियावाडी हे सिनेमे यावर्षी रिलीज झाले आहेत. रनवे 34 बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ तीन कोटींचा व्यवसाय केला होता. गंगूबाई काठियावाडीमध्ये अजय देवगण सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला होता. मात्र, गंगूबाईने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.5 कोटींचा गल्ला जमवला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

अक्षय आणि अजयचे एकाच दिवशी रिलीज झालेले चित्रपट
अक्षय कुमार आणि अजय देवगणचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकत्र प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2009 मध्ये अक्षयचा ‘ब्लू’ आणि अजयचा ‘ऑल द बेस्ट’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते. याशिवाय 2010 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा ‘अॅक्शन रिप्ले’ आणि अजय देवगणचा ‘गोलमाल 3’ भिडला होता. आता 12 वर्षांनंतर दोन्ही कलाकारांचे चित्रपट एकत्र आले आहेत.